राजकारण

एका आत्महत्येवरुन गेले 3 महिने देशात इतकी गंभीर चर्चा…

पवारांनी केली नाराजी व्यक्त!

22 Sept :- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी अद्यापही तपास सुरु असून ड्रग्ज प्रकरणात रोज नव्या सेलिब्रेटींची नावं समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत असताना गेल्या तीन महिन्यांपासून एका आत्महत्येवर इतकी गंभीर चर्चा सुरु आहे अशी विचारणा करत नाराजी व्यक्त केली.

वाचा :- वैज्ञानिकांचा खुलासा; कोरोना लसी बाबद दिली ‘ही’ माहिती!

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शरद पवारांना सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सुरु असलेल्या तपासात आता ड्रग्ज प्रकरणी अनेक सेलिब्रेटींची नावं समोर येत असल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी म्हटलं की, “मला माहिती नाही, मी याकडे लक्ष देत नाही.

वाचा :- शालेय शिक्षण विभागाने काढला ‘हा’ नवा आदेश

आत्महत्या कोणाचीही असो दुख होतं यात काही वाद नाही. पण एका आत्महत्येवरुन गेले तीन महिने देशात इतकी गंभीर चर्चा सुरु आहे. पण मला भीती आहे ती म्हणजे दिवसाला १० ते १५ तर महिन्याला ५० ते ६० शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करणं मला योग्य वाटत नाही”.

वाचा :- राज्य सरकारने काढले ‘हे’ नवे आदेश