वैज्ञानिकांचा खुलासा; कोरोना लसी बाबद दिली ‘ही’ माहिती!
भारतीय वैज्ञानिकांने दिली माहिती!
22 Sept :- सध्या जगभरात कोरोनावरील लसीवर संशोधन आणि काम सुरु आहे. त्यातील काही लशी मानवी चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात आहेत. यापुर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यसभेत माहिती देताना भारतात कोरोनाची लस पुढील वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होईल असं सांगितलं होतं. सध्या देशात कोरोनाचा रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोनावरील लस कधी येईल याची सर्वजण वाट पाहत आहेत.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
भारतीय वैज्ञानिकांने सांगितलं आहे की, देशात सध्या लशीवर काम सुरु असून या वर्षाच्या अखेरपर्यंत कळेल की कोणती लस अधिक प्रभावी आहे आणि कोणती लस प्रभावी नाही ते. त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की जर एखाद्या लसीचे सकारात्मक परिणाम दिसले तर 2021च्या पहिल्या 6 महिन्यांत कोरोनावरील लस भारतात उपलब्ध होईल.सुरुवातीला उपलब्ध लशींचे डोस कमी असतील, कारण लशींच्या उत्पादनाला वेळ लागू शकतो. अशी माहिती वेल्लोरच्या मेडीकल कॉलजचे मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक गगनदीप कांग यांनी ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
वाचा :- शालेय शिक्षण विभागाने काढला ‘हा’ नवा आदेश
कांग हे जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबल एडवायजरी कमिटी’चे सदस्य आहेत. पुढे बोलताना कांग म्हणाले की, भारताची लोकसंख्या जास्त असल्याने सर्वांपर्यंत लस पोहचवणे सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे.
लशींची चाचणी यशस्वी होण्याची शक्यता 50-50
गगनदीप कांग म्हणाले की, भारतात ज्या लसी ट्रायलच्या तिसऱ्या फेजमध्ये आहेत, त्या यशस्वी होण्याची शक्यता 50-50 आहे. या वर्षाच्या अखेरीस या लशींचा डेटा मिळाल्यावर त्यातील कोणती लस प्रभावी ठरेल हे त्यावेस कळेल.
वाचा :- आणि म्हणून 1 ऑक्टोबरपासून टीव्ही महागणार!
जर तेंव्हा आम्हाला एखाद्या लसीचे रिझल्ट सकारात्मक मिळाले तर त्या लसीचं उत्पादन लगेच सुरु केलं जाईल. उत्पादन सुरु झाल्यानंतर देशात पुढील 5-6 महिन्यांत लशी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील.
लशींच्या ट्रायलसाठी भारतात अनुकूल स्थिती-
भारतात सध्या वेगवेगळ्या देशांच्या लशींचं ट्रायल सुरु आहे. पुण्यातील सिरम इंस्टिट्यूटमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. तर डॉ रेड्डी लॅबोरेटरीमध्ये रशियाची लसीचं ट्रायल सुरु आहे. ट्रायल फेजमधील लशींच्या यशस्वी निकालानंतर या लशी भारतात लोकांना दिल्या जातील.
वाचा :- मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
भारतात तयार केलेल्या लशी सध्या क्लिनिकल ट्रायल फेजमध्ये आहेत. ICMR आणि भारत बायोटेक यांनी बनवलेल्या COVAXIN ही लस चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. तर दुसऱ्याबाजूला झायडस कॅडीलाची लस ZyCov-D क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे