महाराष्ट्र

राज्य सरकारने काढले ‘हे’ नवे आदेश

परीक्षांमुळे झाला निर्णय!

22 Sept :- राज्यातल्या विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपास्थिती ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. त्याबाबतचं परिपत्रक शिक्षण विभागाने काढलं आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या असल्याने मनुष्यबळाची गरज आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितले जात आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, निकाल घोषित करणे, फेरमूल्यांकन करणे ही कामे आता असणार आहेत या निर्णयामुळे मनुष्यबळाची कमतरता कमी होईल असा सरकारचा अंदाज आहे.
1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान परीक्षा आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल असं वेळापत्रक पाळायचं आहे.

वाचा :- शालेय शिक्षण विभागाने काढला ‘हा’ नवा आदेश

पण रेल्वेमध्ये शिक्षकांना प्रवेश नाही त्यामुळे शिक्षक आणि इतर कर्मचारी पोहोचणार कसे असा प्रश्न विचारला जात आहे. रेल्वेने प्रवास करण्याची मुभा विद्यापीठाच्या शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भात राज्यसरकारने रेल्वे विभागाला अद्याप विनंती केलेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी प्रवास कसा करायचा असा प्रश्न विचारला जात आहे.

वाचा :- आणि म्हणून 1 ऑक्टोबरपासून टीव्ही महागणार!

दरम्यान, देशात करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. असं असतानाच बिहारने आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यांपासून शाळा बंदच आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. 28 सप्टेंबरपासून शाळा उघडतील असं बिहार सरकारने म्हटलं आहे. त्यासाठी सरकारने काही नियमावलीही तयार केली आहे.

वाचा :- मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय