अन्यथा कोरोनाची साथ आटोक्याबाहेर जाईल
केंद्र शासनाचा राज्याला कठोर शब्दात इशारा!
21 Sept :- कोरोना विषाणूचा राज्यात दिवसेंदिवस कहर वाढतो आहे.सरासरी दर तासाला १ हजार रुग्ण आढळून येत आहेत.कोरोना विषाणूला लवकरात लवकर आटोक्यात आणण्याकरिता आरोग्य विभागाला आणखी काठोर परिश्रम घेणे अत्यावश्यक आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली नाही, तर कोरोना मृत्यू वाढतील आणि साथ खरोखर आटोक्याबाहेर जाईल, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजांनी दिला आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
महाराष्ट्रात वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोना रुग्णांचं वेळेवर निदान होणं आणि विलगीकरणाची व्यवस्था लवकरात लवकर करणं हेच रुग्णसंख्या आणि मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यासाठी गरजेचं आहे.वारंवार सूचना करूनही महाराष्ट्रात तरीही चाचण्यांची संख्या वाढलेली नाही. याबद्दल आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजा यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाला पत्र लिहून इशारा दिला.
वाचा :- घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!
महाराष्ट्रापेक्षा पॉझिटिव्हिटी कमी असूनसुद्धा दक्षिणेकडच्या सर्व राज्यांमध्ये अधिक चाचण्या होत आहेत.गुजरात, पंजाबातसुद्धा चाचण्यांचा दर महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रात मात्र दर 10 लाख लोकांमागे होणाऱ्या चाचण्यांचा दर कमी आहे. दररोज 300 ते 400 एवढ्याच दराने चाचण्या होत आहेत.याबद्दल आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजा यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाला पत्र लिहून इशारा दिला.
वाचा :- दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी