राजकारण

राज ठाकरेंना सिगारेट पिणे पडले महागात

1000 रुपयांचा दंड आला ठोठावण्यात!

21 Sept :- मुंबई ते अलिबाग रो-रो बोटीने प्रवास करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रवासादरम्यान 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. प्रवासादरम्यान धूम्रपान केल्याने त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई-अलिबाग प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी रो-रो बोट सेवा सुरू करण्यात आली.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ही सेवादेखील विस्कळीत झाली होती.मात्र गणेशोत्सवादरम्यान ही रो-रो वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोना महामारीपासून बचावासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांसह प्रवाशी वाहतुकीस परवानगी देण्यात आली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासमवेत या रो-रो बोटीतून प्रवासाचा आनंद लुटला. या वेळी त्यांच्यासह मनसे नेते नितीन सरदेसाई देखील उपस्थित होते.शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मास्क परिधान करणे आवश्यक आहे. प्रवास सुरु होण्याआधी मास्क परिधान करणे, बोटीत धूम्रपान निषिद्ध अशा काही महत्त्वाच्या सूचना प्रवाशांना दिल्या गेल्या होत्या. मात्र राज ठाकरेंनी बोटीच्या मोकळ्या भागात येत अनावधानाने सिगरेट शिलगावली. ही गोष्ट बोटीवरील कर्मचाऱ्याच्या नजरेत येताच त्याने ही बाब राज ठाकरेंच्या लक्षात आणून दिली.

वाचा :- घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!

या करीता 1000 रुपयांचा दंड असल्याचे देखील त्याने सांगितले. आपली चूक लक्षात येताच राज ठाकरेंनी दिलगिरी व्यक्त करत सदर रक्कम दंड म्हणून भरली.मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शुक्रवारी, 18 सप्टेंबर रोजी आपल्या जवळच्या व्यक्तींसह अलिबागवारी केली. यावेळी गाडीऐवजी त्यांनी ‘रो-रो’ बोटीची सफर करण्यास पसंती दिली.

वाचा :- दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी

मुंबई ते अलिबाग हे तीन ते चार तासाचे अंतर या रो-रो बोट सेवेमुळे केवळ 40 मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे. 500 प्रवाशांसह 180 चारचाकी वाहने वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या बोटीची निर्मिती ग्रीसमध्ये झाली आहे. या सेवेचे 235 रुपये माणसी शुल्क असून, यामुळे अलिबाग-मुंबई हा प्रवास अधिक जलद झाला आहे. मुंबईतील भाऊच्या धक्क्यापासून अलिबागच्या मांडवा जेट्टीपर्यंत ही सेवा उपलब्ध आहे.

वाचा :- शालेय शिक्षण विभागाने काढला ‘हा’ नवा आदेश