‘या’ कारणामुळे प्रीती झिंटा संतापली
वीरू, इरफाननं काढले जाहीर वाभाडे!
21 Sept :- इंडियन प्रीमिअर लीगच्या IPL 2020 13 व्या पर्वातील दुसऱ्याच सामन्यात सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात आज झालेल्या सामन्यात चाहत्यांना नाट्यमय निकाल पाहायला मिळाला.पण, या सामन्यातून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. अम्पायरच्या एका चुकीमुळे KXIPचा विजय हिरावला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि इरफान पठाण यांनी सामन्यानंतर ती चूक लक्षात आणून दिली. त्यात आता KXIPची सह मालक व बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिनंही तीव्र शब्दात नाराजी प्रकट करून BCCIकडे एक मागणी केली आहे.अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा KXIPला फटका बसला. वीरू, इरफाननं काढले जाहीर वाभाडे!
वाचा :- घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!
157 धावांचा पाठलाग करताना KXIPचे फलंदाज झटपट माघारी परतले, परंतु मायंक अग्रवालनं तुफानी फटकेबाजी करून सामन्यातील चुरस कायम ठेवली. अखेरच्या षटकात मार्कस स्टॉयनिसनं दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत KXIPला 8 बाद 157 धावांवर रोखले. विजयासाठी 2 चेंडूंत एक धाव हवी असताना मयांक सीमारेषेवर झेलबाद झाला. 1 धाव 1 चेंडू असताना पंजाबला विजय मिळवता आला नाही आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात DCने बाजी मारली.
वाचा :- दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी
19व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मयांक आणि ख्रिस जॉर्डन यांनी तीन धावा पळून काढल्या. पण, पंचांनी एक धाव शॉर्ट असल्याचे जाहीर केले. पण, ती धान शॉर्ट नसल्याचा अनेकांनी दावा केल्या. सेहवागनं तर टीका करताना मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार अम्पायरला द्या, असा खोचक टोमणा हाणला.या सव्र्ह प्रकरणात KXIP ची मालकीण प्रीती झिंटा मात्र जाम संतापलेली दिसून आली आहे.