महाराष्ट्र

महाराष्ट्राचे कोरोना अपडेट!

32 हजारांपेक्षा जास्त जणांना डिस्चार्ज!

21 Sept :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आज मात्र सर्वांच्या मनाला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.कोरोना विषाणूच्या भरधाव गाडीचा गेर टॉपवरच आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होताना दिसू येत आहे.मात्र आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. तरी आजही रुग्णवाढ मात्र चिंताजनकच आहे.सध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येती की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी भर पडत आहे.राज्यात आज सरासरी दर तासाला एक हजार रुग्ण आढळत आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

दरम्यान आज रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दिवसभरात राज्यात तब्बल 32 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 9 लाख 16 हजार 348 एवढी झाली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 74.84 एवढं झालं आहे. तर राज्यात 24 तासांत 15 हजार 738 नवे रुग्ण आढळून आलेत तर 344 जणांचा मृत्यू झाला. मृत्यूची टक्केवारी 2.7 एवढी झाली आहे.

वाचा :- घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!

राज्यात 2 लाख 74 हजार 623 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्णांची एकूण संख्या ही 12 लाख 24 हजार 380 एवढी झाली आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५९,१२,२५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,२४,३८० (२०.७१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात १८,५८,९२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,५१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

वाचा :- दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी