राजकारण

‘या’ कारणामुळे मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले

21 Sept :- मराठा समाजातील नेत्यांची मानसिकता कधीच मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी नव्हती. म्हणूनच इतके वर्ष सत्तेत असूनही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. राज्यातील श्रीमंत मराठ्यांना समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये असे वाटते. कारण आरक्षण मिळाल्यास मराठा समाज बॅकवर्ड झाला तर, राज्यातील श्रीमंत आणि मोठ्या मराठ्यांच्या नावापुढेही बॅकवर्ड शब्द लागेल अशी भिती त्यांना वाटते अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात केली.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

मराठा गरीब राहील तेवढे तो मोठे नेते सांगतील तसे वागेल. या नेत्यांना मराठा समाजातील अशी माणसेच पाहिजे आहेत. परंतु राज्यातील मराठ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. आरक्षण नसेल तर शिक्षण नाही, शिक्षण नसेल तर नोकरी नाही, नोकरी नसेल तर आर्थिक स्थिती सुधारणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ मराठा समाजासाठी पंधराशे कोटी रुपये मंजुर करावेत.

वाचा :- घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!

संसदेत तीन विधेयके मंजूर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, शेतकऱ्यांच्या पायातील बेडी तोडली आहे असे सांगून आ. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचा राजा म्हणवणारे शरद पवार राज्यसभेत उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीच्या खासदारांनीही वाॅक आऊट केले. लोकसभेत पाठिंबा देणार्या शिवसेनेने राज्य सभेत विरोध केला. शिवसेना व राष्ट्रवादी यांचा खुर्चीसाठी सुरू असलेला हा गोंधळ आहे अशी टीका त्यांनी केली. आपल्या देशात शेतकऱ्यांच्या हितापेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व दिले जाते. शेतकरी नेतेही स्वार्थानुसारच भूमिका ठरवतात असा टोला त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना लगावला.

वाचा :- दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी