भारत

नवा उच्चांक! देशात 94 हजार रुग्ण कोरोनमुक्त

20 Sept :- देशभरात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक होत चालली आहे.मात्र देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच काही दिलासादायक आकडेवारीही समोर आली आहे. दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांनी उच्चांक गाठला आहे.गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 94,612 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची देशातली संख्या ही 43 लाख झाली आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट 79.68 टक्के एवढा झाला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

नवे रुग्ण आढळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 23 हजारांच्या आसपास नवे पेशंट आढळून येत आहेत.महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी 60 टक्के पेशंट आहेत.

वाचा :- घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने 52 लाखांचा आकडा पार केला आहे. तर मृत्यूची संख्या ही 85 हजारांवर पोहोचली आहे.गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 96 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.

वाचा :- दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी