पुस्तक फाडलं, माईक तोडला; गोंधळातच कृषि विधेयक राज्यसभेत संमत
नवी दिल्ली : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. तोमर हे उत्तर देत असताना विरोधकांनी मात्र राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. राज्यसभेचं कामकाज उद्या सकाळी ९.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलंय.
उल्लेखनीय म्हणजे, राज्यसभेचं कामकाज आज दुपारी १.०० वाजता पूर्ण होणार होतं. परंतु, विधेयक संमत करून घेण्यसाठी उपसभापतींनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला.