महाराष्ट्र

‘या’ कारणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला!

19 Sept :- दहावीच्या परीक्षेत अवघ्या काही गुणांनी अनुत्तीर्ण झालेला ओम (नाव बदललेले आहे) गेल्या काही दिवसांपासून फेरपरीक्षा कधी होणार याच्या प्रतीक्षेत आहे. ही परीक्षा झाल्यास त्यासाठी पुन्हा जोमाने अभ्यास करता येईल आणि पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल, अशी त्याची अपेक्षा आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

खरंतर दहावी-बारावीचा निकाल लागून दीड महिना उलटला, तरी अद्याप फेरपरीक्षेबाबत प्रश्नचिन्ह असल्याने ओमसारख्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.गेल्या काही दिवसांपासून ओम फेरपरीक्षा कधी होणार याबाबत चौकशी करण्यासाठी सातत्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालय फोन करत आहे.परंतु त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचे त्यांनी सांगतिले.

वाचा :- घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!

राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार तसेच फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या परीक्षा होतील, याबाबतही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती समोर येत आहे.दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्यात, तर दहावीचा निकाल जूनमध्ये जाहीर करण्यात येतो. त्यानंतर तत्काळ जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नव्हते. परंतु यंदा कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या परीक्षांचे निकाल उशिरा जाहीर झाले. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी,’ राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता या परीक्षा आता दिवाळीनंतरच होतील, असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

वाचा :- दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी

दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या पुनर्परीक्षा लांबणीवर पडणार असल्याचे चित्र गायकवाड यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. परंतु या फेरपरिक्षांबाबत आतापर्यंत तरी अनिश्चितता असल्यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढत असल्याचे दिसून येते.”दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या परीक्षांचे नियोजन सुरू आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल.”

वाचा :- अशी झाली आहे वाईट अवस्था कॅन्सर पीडित संजू बाबाची