भारत

‘या’ रोगाच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाच्या नाकी नऊ

19 Sept :- देशासह जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. पण आता कोरोनाचे हेच संकट टळत नाही तोवर आणखी एक संकट समोर येऊन ठाकले आहे. कोरोनासारखेच लक्षणे असलेल्या सारी रुग्णांची वाढती संख्या देखील आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढवणारी ठरली आहे.नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन रुग्ण शोध मोहीम सध्या सुरू असून, आजवर सुमारे 5 लाखांहून अधिक कुटुंबापर्यंत आरोग्य कर्मचारी पोहचले आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

या शोध मोहिमेत कुटुंबातील सर्व व्यक्तीची माहिती, त्यांना असलेल्या आजाराबाबत माहिती घेताना त्याचे तापमान, पल्स तपासले जात आहे.त्यात बहुतांशी नागरिकांना बारीकसा ताप असल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांची कोविड टेस्ट केली जात आहे.साधारणपणे 30 टक्के रुग्णांना सारीची लक्षणे दिसू लागली असून, अशा सर्वाना ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड हेल्थ केअर सेन्टर मध्ये दाखल करून उपचार केले जात आहेत. त्यात रुग्ण निगेटिव्ह असल्यास, त्याच्यावर सारीचे उपचार केले जात आहे.

वाचा :- घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!

सारी रुग्णांना अंगात ताप येणे, सर्दी, खोकला येणे व श्वास घ्यायला त्रास होणे ही प्रामुख्याने लक्षणे दिसतात. त्यामुळे अशा रुग्णांवर कोरोना प्रमाणेच उपचार केले जात आहेत.जिल्ह्यातील 37 कोविड सेंटरलाच त्यामुळे फिवर सेन्टर म्हणुनही गणले जात असून, आजवर या सेन्टर मध्ये 29 हजार 960 तापाच्या रुग्णांवर उपचार केले गेले आहेत. सध्याचे हवामान, तापमानातील बदल पाहता जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसाअखेर 300 ते 350 रुग्ण तापाचे सापडत आहेत.

वाचा :- दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी

वाचा :- अशी झाली आहे वाईट अवस्था कॅन्सर पीडित संजू बाबाची