भारत

‘हे’ झाले मोठे नुकसान लॉकडाऊनमुळे!

19 Sept :- कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मुक्त संचार करणे अशक्य झाल्याने देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते.मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.सर्व सामान्य जनतेला रोज मोठ्या आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.लॉकडाऊनने देशभरातल्या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही बाब धक्कादायक आकडेवारीमधून उघड झाली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

लॉकडाऊनमुळे तब्बल ६० लाख कर्मचारी बेरोजदार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे ६० लाख कर्मचारी बेरोजगार झाल्याचा अहवाल सीएमआयईने दिला. त्यात हे अधोरेखीत करण्यात आले आहे.कोरोना व्हायरसला रोखण्याच्या उद्देशाने मार्च ते ऑगस्ट यादरम्यान लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊनमुळे ६० लाख कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. इंजिनिअर, फिजिशियन, अकाउंटंट, विश्लेषक आणि शिक्षक यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे.

वाचा :-  घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी अर्थात सीएमआयई या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.सीएमआयई’ने म्हटलं की, सरकारने जूनमध्येच अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू केली असली तरी, सातत्याचे निर्बंध आणि स्थानिक पातळीवरील लॉकडाऊन यामुळे अर्थव्यवस्थेच्या सुधारणेत अडथळे येतात. त्यामुळे रोजगाराच्या मार्गातही असेच अडथळे निर्माण झाले.

वाचा :-  दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी

मे-ऑगस्ट २०२० या काळात कर्मचाऱ्यांची संख्या घटून १२.२ दशलक्षांवर आली. २०१६ नंतरचा हा नीचांकी आकडा आहे. २०१६ सालापासून रोजगारात वाढ होत होती. मात्र लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा २०१६ इतकी रोजगाराची आकडेवारी आली आहे.

वाचा :- अशी झाली आहे वाईट अवस्था कॅन्सर पीडित संजू बाबाची