बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! आज ‘128’ रुग्ण कोरोनमुक्त

बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट!

19 Sept :- दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यातील नागरिकांची आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरत असला तरी जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या दिलासा देणारी ठरत आहे.कोरोना विषाणूची भीती बाजूला ठेवून योग्य ती ‘खबरदारी’ घेतल्यास नक्कीच कोरोनाशी लढा देता येतो हे स्पष्ट होऊ लागले आहे.शरीरामध्ये सौम्य लक्षण आढळतात त्वरित नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्य आहे. मात्र नागरिक डॉक्टरांच्या परस्पर मनानेच मेडिकलवर जाऊन दैनंदिन गोळ्या-औषंधाची खरेदी करून कोरोना दुखणं अंगावर काढत आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

आज बीड जिल्ह्यामध्ये कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासा देणारी आहे. आज बीड जिल्ह्यातून तब्बल 128 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती मिळाली आहे.आजवर बीड जिल्ह्यातून एकूण 238 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 9.7% आहे.तर रिकव्हरी रेट 65.48 % आहे.
त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका…काळजी घ्या!

वाचा :-  घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!