राज्यमंत्री बच्चू कडू कोरोनाच्या विळख्यात!
19 Sept :- कोरोना विषाणूने सर्वत्र कहर केला आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मानवी आयुष्य विस्कळीत आणि उध्वस्त झाले आहे.कोरोना विषाणूचे संक्रमण सर्वत्र वेगाने वाढते आहे.कोरोना विषाणूच्या घेऱ्यात आतापर्यंत मोठं मोठी सेलिब्रेटी कलावंत,खेळाडू,राजकीय नेते,प्रशासकीय अधिकारी आली आहेत.तर अनेक सुरक्षित स्थळी सुद्धा कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
आताच हाती आलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी”, असं आवाहन त्यांनी केलं आहे.बच्चू कडू यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित आढळून आलं आहे.
वाचा :- घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!
वाचा :- दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी