भारत

माजोडा चीन भारताच्या ‘या’ ठिकाणी ठेवतोय पाळत

19 Sept :- गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान सीमेवर तणाव आहे. चीनच्या मुजोरीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. त्यातच चीन भारतातल्या महत्त्वाच्या व्यक्तिंवर नजर ठेवत असल्याचंही उघड झालं होतं. आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चीन भारतीय युद्धनौकांवरही पाळत ठेवत होता अशी माहिती बाहेर आली आहे.चीनच्या Yuan Wang या टेहाळणी नौकेने मलाक्काच्या समुद्रधुनी परीसरात प्रवेश केला होता आणि तिथून ते भारतीय नौकांची टेहाळणी करत होते अशी माहिती समोर आली आहे. त्या भागात तैनात असलेल्या भारतीय युद्ध नौकांवर ते सतत लक्ष ठेऊन होते.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

भारतीय नौदलाच्या ही बाब लक्षात येताच चीनच्या नौकेने काढता पाय घेतला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.तंत्रज्ञानाच्या मदतीने चीन भारतीयांवर नजर ठेवत असल्याचं पुढे आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता ही माहिती पुढे आल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढणार आहे.इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर हे तिन्ही देश मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या परिसरात आहेत. ही सामुद्रधुनी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे ही घटना गंभीर समजली जाते. भारतीय नौदलाच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हालचाली करत सूचक इशारा दिला.चिनी सैन्य आता लडाखमध्ये ऑप्टिकल फायबर केबल्सचे जाळे उभे करीत असल्याचे वृत्त आहे.

वाचा :-  घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!

या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत होत असलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनामुळे पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका अधिक तीव्र झाला आहे. या धोक्याने 17 वर्षाच्या उच्चांकाची नोंद गाठली आहे.संसदेच्या मान्सून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, पाकिस्तानी सैन्याने सीमेवर 1 जानेवारी ते 7 सप्टेंबर या कालावधीत 3186 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय सीमेवर या कालावधीत सीमापार गोळीबाराच्या 242 घटना घडल्या असल्याचीही नोंद या अहवालात करण्यात आली आहे.

वाचा :-  दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी

वाचा :- अशी झाली आहे वाईट अवस्था कॅन्सर पीडित संजू बाबाची