बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम; आज 155 रुग्ण आढळले!

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे थैमान सुरु झाले आहे. कोरोनाच्या उद्रेकाचा सुरु खेळ आता चांगलाच सुरु झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस काही प्रमाणात भर पडत होती मात्र आता कोरोना विषाणूने आपल्या गाडीचा टॉप गेर उचलला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.एकंदरीत कोरोना विषाणूच्या संक्रमना पासून स्वतः खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.माझी कुटुंब माझी जबाबदारी या योजने प्रमाणे प्रत्येकाने कोरोनाशी दोन हात करणे गरजेचे आहे.आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत मोठी भर पडली आहे.आज बीड जिल्ह्यात 155 नवे रुग्ण आढळले आहेत.