क्रीडा

आज पासून IPL च्या रोमांचक सीरिजला प्रारंभ;मुंबई आणि चेन्नई भिडणार!

मुंबई आणि चेन्नई भिडणार!

19 Sept :- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा ipl रोमांच पाहिला मिळणार कि नाही असा प्रश्न अनेक क्रिकेटप्रेमींच्या माणात घर करून होता. आणि अखेर या प्रश्नाचं उत्तर क्रिकेटप्रेमींना भेटले आहे.2020 या शापित वर्षात सुखद बातमी कोणची ऐकण्यास आली असेल तर नक्कीच ipl सीरिजला आज पासून प्रारंभ होतो आहे ही सुखद बातमी आहे.असे म्हणता येईल.भारतामध्ये लोकप्रिय असणाऱ्या ipl च्या रोमांचक सिरीजला आजपासून सुरुवात होत आहे.आणि सलामीच्याच सामन्यात क्रिकेटप्रेमींना हायहोल्टेज सामना पाहण्यास मिळणार आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

ipl मधील लोकप्रिय असणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई संघात आजची सलामी लढत होणार आहे.सामना आज आबुधाबीतील शेख जायेद स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. अनेक असे खेळाडू आहेत, जे अद्याप दुबईतील मैदानांवर एकही सामना खेळलेले नाहीत.

वाचा :-  घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!

आयपीएलच्या सामन्यांमध्ये ते पहिल्यांदाच दुबईतील मैदानांमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत. अशातच इतिहासात दुसऱ्यांदा आयपीएल भारताबाहेर दुबईत खेळवण्यात येत आहे. याआधी 2009मध्ये लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचं आयोजन भारताबाहेर दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं होतं. तसेत 2014मध्येही लोकसभा निवडणुकांमध्ये आयपीएलचा फर्स्ट हाफ दुबईत खेळवण्यात आला होता.

वाचा :-  पालकांनो सावधान! राज्यात वाढतेय कोरोना बाधित मुलांची संख्या