देश विदेश

नवं संकट! ब्रूसेला विषाणूचं थैमान चीनमध्ये सुरु

चीनमध्ये ब्रूसेला विषाणूने केले हजारो लोक संक्रमित!

18 Sept :- चीनपाठोपाठ जगभरात कोरोनाव्हायरस पसरला आणि थैमान घालू लागला. अजूनही कोरोनाशी लढा सुरू आहेत. त्याला हरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता आणखी एक नवं संकट आलं आहे. कोरोनाव्हायरस पाठोपाठ आता ब्रुसेला बॅक्टेरियाही थैमान घालू लागला आहे. ज्या चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा सर्वात आधी उद्रेक झाला होता. त्याच चीनमध्ये आता बॅक्टेरियाचाही उद्रेक झाला आहे.उत्तर-पूर्व चीनमध्ये ब्रुसेल्लोसिस आजाराने कहर केला आहे. हा ब्रुसेला बॅक्टेरियामुळे होणार आजार आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

गांझू प्रांतातील लांझाऊच्या आरोग्य आयोगाने सांगितलं, 3,245 लोक ब्रुसेल्लोसिस संक्रमित आहेत.चीनमध्ये गेल्यावर्षीदेखील हा बॅक्टेरिया पसरला होता.सीएएन रिपोर्टनुसार, 2019 साली जुलै आणि ऑगस्टदरम्यान झोंगमु लांझोऊ बायोलॉजिकल फर्माक्युटिकल फॅक्ट्रीमध्ये या बॅक्टेरियाविरोधात प्राण्यांसाठी लस तयार केली जात होती. त्यावेळी बॅक्टेरिया लीक झाला आणि हा आजार पसरला होता. त्यावेळी मुदत संपलेलं डिसइन्फेक्ट आणि सॅनिटायझर वापरण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे.

वाचा :- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले;’या’ महिन्यात मिळेल कोरोना लस!

त्यामुळे हवेत पसरलेल्या या बॅक्टेरियाचा पूर्णपणे नाश झाला नव्हता.यूएसच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) दिलेल्या माहितीनुसार, या आजाराला माल्टा फिव्हर असंही ओळखलं जातं. यामुळे डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, ताप आणि थकवा जाणवतो, काही अवयवांना सूजही येते. यापैकी काही लक्षणांची तीव्रता कमी होते. तर काही लक्षणं अधिक गंभीर दिसू लागतात तर काही लक्षणं पूर्णपणे जातही नाहीत म्हणजे तशीच कायम राहतात.हा आजार माणसांमार्फत माणसांमध्ये पसरणं फार दुर्मिळ आहे. हा बॅक्टेरिया असलेल्या प्राण्यांचं मांस खाल्ल्यास किंवा श्वसनामार्फतही हे बॅक्टेरिया मानवी शरीरात जातात. याचा सर्वात जास्त दुष्परिमाम पुरुषांवर होतो. त्यांच्या टेस्टिकलला सूज येते, यामुळे त्यांना वंध्यत्वही येऊ शकतं.

वाचा :-  घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!