अशी झाली आहे वाईट अवस्था कॅन्सर पीडित संजू बाबाची
प्रसिद्धी,संपत्ती,पैसा,लोकप्रियता सर्व काही शून्य आहे एका आजरी आणि पीडित शरीर समोर.एक स्वस्थ शरीर जीवनांतील अनेक आनंदाचे क्षण देऊन जात मात्र एक आजरी शरीर क्षणो क्षणी मारी चाहूल देत राहत.हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाच्या वेगळ्या स्टाईलने ओळखल्या जाणारा लोकप्रिय अभिनेता संजय दत्त सध्या फुफ्फुसांच्या कर्करोगावर उपचार घेतो आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला कॅन्सर झाल्याचे निदान झाले.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
सध्या संजय दत्त पत्नी मान्यता दत्तसोबत दुबईमध्ये आहे. रिपोर्टनुसार संजय दत्त पत्नीसोबत चार्टर्ड फ्लाइटने मुलगा शहरान आणि इकराला भेटण्यासाठी दुबईला गेला आहे. संजय दत्तला मुलांना भेटण्याची फार इच्छा झाली होती म्हणून तो दुबईला पोहोचला. मान्यताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फॉमिली फोटो शेअर केला आहे. ज्यात संजय दत्त खूप कमजोर झालेला दिसतोय.
वाचा :- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले;’या’ महिन्यात मिळेल कोरोना लस!
मान्यताने जो फोटो शेअर केला आहे त्यात संजयचे गाल आत गेलेले आणि चेहरा थकलेला. आजारपणामुळे तो खूप अशक्त झाले दिसतोय. तरीही या फोटोत संजय हसण्याचा प्रयत्न करतोय.मान्यताने हा फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले, आज मी देवाचे आभार मानते, ज्याने मला इतकं सुंदर कुटुंब दिले. माझी कोणतीच तक्रार नाही आहे, कोणतीच विनंती नाही, फक्त आम्ही सगळे कायमचे असेच एकत्र राहुदेत… आमीन कॅन्सवर उपचार घेत असताना संजय दत्तने याचा परिणाम कामावर होऊ दिला नाही. त्याने शमशेर चित्रपटाचे शूटिंग केले.
वाचा :- घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!
उपचारांसोबत संजय दत्त शमशेरावरसुद्धा फोकस देतो आहे. पहिल्या टप्प्यातील उपचार पूर्ण झाल्यानंतर लवकरच दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुबईवरुन 10 दिवसांत संजय दत्त परतल्यानंतर त्याची दुसरी किमोथेरेपी सुरु करणार आहे.
वाचा :- पालकांनो सावधान! राज्यात वाढतेय कोरोना बाधित मुलांची संख्या