क्रीडा

…आणि विराट खेळणार सनरायझर्स हैदराबादकडून!

18 Sept :- देशभरात लोकप्रिय असणाऱ्या IPL 2020 च्या रोमांचिक सीरिजला काही दिवसांमध्येच प्रारंभ होत आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमी IPL 2020 च्या हंगामाची उत्सुकतेने वाट पाहात आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू या हंगामात युवा खेळाडूंवर सर्वांच्या नजरा आहेत. असाच एक युवा खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करून आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

आयपीएलच्या लिलावात विराट सिंह या युवा खेळाडूचे नाव सर्वात आघाडीवर होते. 20 लाख बेस प्राईज असलेल्या विराटवर 1.90 कोटींची बोली लागली.विराटला संघात घेण्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि हैदराबाद यांच्यात चुरस रंगली होती. मात्र अखेर हैदराबादनं विराट सिंहला आपल्या संघात घेतले.

वाचा :- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले;’या’ महिन्यात मिळेल कोरोना लस!

झारखंडचा फलंदाज विराट सिंह याचे नाव विराट असले तरी तो धोनीचा चाहता आहे. विराट भारतासाठी अंडर-19 वर्ल्ड कप खेळला आहे.तर, सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं 10 सामन्यात 57.16च्या सरासरीनं 343 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्यानं 3 अर्धशतकही लगावले होते. त्यामुळं आयपीएलमुळं भारतीय संघाला आणखी एक विराट कोहली मिळण्याची शक्यता आहे.

वाचा :-  पालकांनो सावधान! राज्यात वाढतेय कोरोना बाधित मुलांची संख्या

यंदाच्या आयपीएल 2020 सिरीजमध्ये क्रिकेट प्रेमींच्या नजरा या नवीन विराटकडे निश्चितच राहणार आहे.विराट कोहली प्रमाणेच हा नवीन विराट सुद्धा विराट खेळी करेल आशा अनेक अपेक्षा क्रिकेटप्रेमींना आहेत.

वाचा :-  घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!