राजकारण

फडणवीसांनी मनमोहन सिंहांवर केली ‘ही’ टीका

पंतप्रधान मोदींची केली स्तुती!

18 Sept :- देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंहांच्या काळात देश रसातळाला गेला. मनमोहन सिंह सज्जन व्यक्ती होते मात्र त्यांचं सरकारवर काहीही नियंत्रण नव्हतं. त्यावेळी प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता, मात्र पंतप्रधान स्वत:ला पंतप्रधान समजत नव्हते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

भाजपच्या सेवा सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशातील भ्रष्टाचार कमी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराची लढाई सुरु केली आणि ना खाऊंगा न खाने दुंगा हा मार्ग अवलंबला. नरेंद्र मोदींनी दिल्लीतील प्रस्थापित भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान दिलं आणि ती मोडीत काढली. व्यवस्था नुसती मोडीत नाही काढली तर नवी व्यवस्थाही त्यांनी उभी केली. आता दिल्लीत मंत्रालयात कुणाची लाच मागण्याची हिंमत होत नाही.

वाचा :- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले;’या’ महिन्यात मिळेल कोरोना लस!

कोरोना काळात महाराष्ट्रात मंत्रालयात शुकशुकाट होता, मात्र दिल्लीत मंत्रालय सुरु होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तुलना स्वामी विवेकानंद यांच्याशी केली. मोदीची स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित झाले. त्यानंतर मोदीजींनी स्वयंसेवक होऊन देशसेवा सुरु केली. नरेंद्र मोदींचं एकूण व्यक्तीमत्त्व पाहिलं तर त्यात स्वामी विवेकानंदांची झलक त्यांच्यात दिसते. स्वामी विवेकानंदांप्रमाणे योद्धा संन्यासी होऊन मोदीजी जीवन जगत आहेत.

वाचा :-  पालकांनो सावधान! राज्यात वाढतेय कोरोना बाधित मुलांची संख्या

वाचा :-  घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!