राजकारण

पुतळा उभारण्याला माझा विरोध आहे – आंबेडकर

18 Sept :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारला ऐनवेळी रद्द करावा लागला. या कार्यक्रमासाठी मोजून सोळा जणांना बोलवण्यात आले होते. त्यामुळे अनेक नेते नाराज होते. प्रकाश आंबेडकरांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

इंदू मिलमध्ये स्मारकाऐवजी लोकोपयोगी वास्तू उभारा असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केलं आहे.माझा पुतळा उभारण्याला विरोध आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. पुतळा उभारण्याऐवजी एक बौध्दीक विचार केंद्र निर्माण व्हावं अस मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. तसंच इंदू मिलमधील स्मारकाच्या कार्यक्रमाला जाण्यात मला रस नाही असंही त्यांनी म्हटलं.

वाचा :- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले;’या’ महिन्यात मिळेल कोरोना लस!

याआधी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, की माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ही जागा इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्टडीजसाठी दिली होती. या जागेबाबतच्या अटलजींच्या पत्राचं अध्ययन मुख्यमंत्र्यांनी करावं, असंही आंबेडकर म्हणाले. मात्र, इथल्या राजकारण्यांनी ही जागा पुतळ्यासाठी वापरली. त्यामुळे न्यायालयाला मी विनंती करतो की, त्यांनी पुतळयाचा आणि सुशोभीकरणाचा निधी वाडिया रुग्णालयासाठी वर्ग करण्याचा आदेश द्यावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वाचा :-  घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!