बीड

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबेना; आज 178 रुग्ण पॉझिटिव्ह!

18 Sept :- बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे थैमान सुरु झाले आहे. कोरोनाच्या उद्रेकाचा सुरु खेळ आता चांगलाच सुरु झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस काही प्रमाणात भर पडत होती मात्र आता कोरोना विषाणूने आपल्या गाडीचा टॉप गेर उचलला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.एकंदरीत कोरोना विषाणूच्या संक्रमना पासून स्वतः खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.माझी कुटुंब माझी जबाबदारी या योजने प्रमाणे प्रत्येकाने कोरोनाशी दोन हात करणे गरजेचे आहे.

वाचा :- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले;’या’ महिन्यात मिळेल कोरोना लस!

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत मोठी भर पडली आहे.आज बीड जिल्ह्यात 178 नवे रुग्ण आढळले आहेत.
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये
बीड – 31,
अंबाजोगाई – 35,
आष्टी -6,
धारूर – 13,
गेवराई – 15,
केज -19,
माजलगाव-11,
परळी वै -27,
पाटोदा- 10,
शिरूर कासार – 8,
वडवणी – 30आशा पद्धतीने बीड जिल्ह्यात एकूण 178 रुग्ण आढळले आहेत.

वाचा :- घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!