महाराष्ट्र

राज्यात 8 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

17 Sept : – राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आज मात्र कोरोना विषाणूच्या थैमानाने टॉप गेर उचलला आहे. अनलॉक ४ ची सुरुवात झाली आहे.जिल्हाबंदी देखील हटवण्यात आली आहे.मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्यात आता भरमसाठ वाढ होताना दिसू लागली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी रुग्णवाढ मात्र चिंताजनक होत चालले आहे.साध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येती की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी भर पडत आहे. राज्यात आज एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख १२ हजार ३५४ पोहोचली आहे. आज २४ हजार ६१९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या ३ लाख १ हजार ७५२ ॲक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

वाचा :- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले;’या’ महिन्यात मिळेल कोरोना लस!