भारत

रेल्वेचे तिकीट महागणार!

17 Sept :- रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी आता जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. रेल्वे बोर्ड चेअरमॅन आणि सीईओ विनोद कुमार यादव (V K Yadav) यांनी याबाबत माहिती दिली आहे. एअरपोर्ट्ससाठी वसुल केल्या जाणाऱ्या युजर्स चार्जप्रमाणे काही रेल्वे स्टेशनवरही युजर चार्ज घेतला जाईल. सध्या देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे रेल्वे सेवांवर नियमित सुरू करण्यात आलेल्या नाहीत.मात्र रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ विनोद कुमार यादव यांनी हे संकेत दिले आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

विमानतळांवर आकारण्यात येणाऱ्या यूझर चार्जच्या धर्तीवर रेल्वे स्टेशनावंरही यूझर चार्ज आकारण्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनीही खासगी रेल्वेंचे दर हे बाजार भावाच्या परिस्थितीनुसार निश्चित केले जातील, असं सांगितले आहे. रेल्वे प्रवासात अधिक पैसे आकारुन अतिरिक्त सेवाही आगामी काळात पुरवण्यात येतील.

वाचा :- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले;’या’ महिन्यात मिळेल कोरोना लस!

देशभरातील एकूण रेल्वे स्टेशनपैकी 10 ते 15 टक्के रेल्वे स्टेशनांवर हा अतिरिक्त यूझर चार्ज आकारण्यात येणार आहे. देशाताली १०५० रेल्वे स्टेशनांची मर्यादा वाढविण्यात येणार आहे. हे करण्यासाठी या स्टेशनांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. अशा स्टेशनांवर यूझर चार्ज आकारण्यात येईल. देशात सद्यस्थितीत सुमारे 7 हजार रेल्वे स्टेशन आहेत.

वाचा :- मी जातीने ब्राह्मण असल्याने काही लोक मला टार्गेट करतात -फडणवीस

यूझर चार्जबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र ही रक्कम किती असेल, याबाबत विनोद कुमार यादव यांनी स्पष्ट सांगितले नाही. ही रक्कम कमी असेल असे संकेत मात्र त्यांनी दिले आहेत. मोठ्या आणि गर्दी असलेल्या स्टेशनावंर हा यूझर चार्ज आकारण्यात येणार आहे. तिकिट काढतानाच त्यातच हा यूझर चार्ज जोडूनच खिडकीवर तिकिट देण्यात येईल.

वाचा :- घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!