राजकारण

‘या’ कारणामुळे ठाकरे सरकारवर संभाजीराजे भडकले!

17 Sept :- राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ठाकरे सरकराने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या बैठकीनंतर दिली. मात्र आता या निर्णयावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारला मराठा समाजाला चिथावणी घ्यायची आहे का?, असा संतप्त सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

मराठा आरक्षणावर निर्णय होईपर्यंत पोलीस भरती करु नये अशी मागणीही संभाजीराजेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे. संभाजीराजेंबरोबरच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटवरुन या निर्णयाचा विरोध केला आहे.मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नसताना ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय ऐकून मी दु:खी झालो आहे असं संभाजीराजेंनी सांगितलं.

वाचा :- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले;’या’ महिन्यात मिळेल कोरोना लस!

“सध्या पोलीस भरती करुन घेण्याचं वातावरण नाहीय. मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. या मोर्चांना बहुजन समाजाने पाठिंबा दिल्याने ते यशस्वी झाले. आजही मराठा समाज दुखी असून त्यांना आरक्षण कसं मिळणार याकडे अधिक लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे,” असं संभाजीराजे म्हणाले. नोकरभरती करायची असल्याच पुढच्या टप्प्यात करावी त्याबद्दल एवढ्या घाईत निर्णय घेण्याची गरज काय असा प्रश्नही संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे. “नोकरभरती पुढच्या टप्प्यात करावी.

वाचा :- मी जातीने ब्राह्मण असल्याने काही लोक मला टार्गेट करतात -फडणवीस

आजच नोकरभरती घ्यायचीय का? तुम्हाला (सरकारला) मराठा समाजाला चिथावणी घ्यायची आहे का? मराठा आरक्षाचा निकाल लागेपर्यंत पोलीस भरती करु नका. बाकी समाजाचे लोक समजून घेतील. समाजातील लोकांनी एकत्र राहण्याची गरज असून आता पोलीस भरतीचा निर्णय घेणं म्हणजे मराठी समाजाला चिथावणी देण्यासारखंच आहे,” असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

वाचा :- एसटीचे वाढणार उत्पन्न;राज्य शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!