‘या’ पद्धतीने काँग्रेसने साजरा केला पंतप्रधान मोदींचा वाढदिवस
17 Sept :- भारत देशाचे कणखर नेतृत्व आणि कर्तव्यदक्ष पंतप्रधान म्हणून जगभरात लोकप्रिय असणाऱ्या नरेंद्र मोदींचा वाढदिवस आज देशभरात साजरा होत आहे.तर जगभरातून नरेंद्र मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.वाढदिवसाच्या निमित्ताने 14 सप्टेंबरपासून भाजप एक आठवड्याचं सेवा कार्य करत आहे. राष्ट्रीय स्तरापासून राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर सेवा कार्य केले जात आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
काँग्रेस पक्षाने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला आहे. देशभर काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगारी दिन म्हणून साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाला काँग्रेसला राष्ट्रीय बेरोजगारी दिन असं नाव दिलं आहे. एनएसयूआयकडून बेरोजगारीच्या मुद्द्यावर अनेक ठिकाणी भजी विकत विरोध केला गेला.
वाचा :- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले;’या’ महिन्यात मिळेल कोरोना लस!
आज सकाळपासून #राष्ट्रीयबेरोजगारीदिवस, #NationalUnemploymentDay असे हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी युवक काँग्रेसतर्फे सोलापुरात उपरोधिक आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. यावेळी उपस्थिताना लॉलीपॉपचे वाटप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.
वाचा :- मी जातीने ब्राह्मण असल्याने काही लोक मला टार्गेट करतात -फडणवीस
सोलापुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. नोटबंदी, जीएसटी, कांदा निर्यात बंदी सारखे विचित्र निर्णय घेतल्याने तुघलक अशी उपाधी दिल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात भजी, पकोडे तळून आणि चहा विक्री करून निषेध नोंदवला. उच्च शिक्षित तरुणांनी यावेळी भजी तळून निषेध नोंदवला.
वाचा :- अखेर पुरावा भेटला;चीनच्या लॅब मध्येच तयार झाला कोरोना विषाणू