क्रीडा

विराटवर आरोप; चुकीच्या खेळाडूंना देतो पाठिंबा!

17 Sept :- अवघ्या दोन दिवसातच IPL 2020 च्या रोमांचक सीरिजला सुरुवात होत आहे.क्रिकेटप्रेमीं मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्येकजण IPL 2020 चे रोमांचक सामने पाहण्याकरिता उत्सुकतेने वाट पाहत आहे. या दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे माजी कोच रे जेनिंग्ज यांनी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीवरवर काही आरोप केले आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की, विराट त्यांचे ऐकायचा नाही आणि चुकीच्या खेळाडूंना टीममध्ये खेळण्यास जागा द्यायाचा.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

रे यांच्या मते हेच कारण आहे की, आरसीबी एकदाही आयपीएल चॅम्पियन बनू शकली नाही आहे. पण भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याने उत्तम कामगिरी केली आहे. तो कर्णधार असताना भारताला टेस्ट क्रिकेटमध्ये 60 टक्के मॅचमध्ये विजय मिळाला आहे. जेनिंग्ज 2009 ते 2014 या काळात आरसीबीचे कोच होते.जेनिंग्जच्या मते विराट त्याच्या हिशोबाने प्लॅन तयार करत असे.

वाचा :- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले;’या’ महिन्यात मिळेल कोरोना लस!

ते पुढे असे म्हणाले की, ‘त्यावेळी संघात 25-30 खेळाडू असायचे. सर्व खेळाडूंवर नजर ठेवण्याचे माझे काम होते. माझे असे मत होते की, काही खेळाडू विशेष परिस्थितीत बॅटिंग किंवा बॉलिंग करतील पण त्याचे प्लॅन्स काही वेगळे असयाचे. तो चुकीच्या खेळाडूंना पाठिंबा द्यायचा’.क्रिकेट डॉटकॉमशी केलेल्या चर्चेमध्ये जेनिंग्ज यांनी याबाबत भाष्य केले की कसे आयपीएलमधील कर्णधारपद क्रिकेटपेक्षा जास्त आव्हानात्मक आहे. ते म्हणाले की, ‘आयपीएल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा वेगळे आहे.

वाचा :- मी जातीने ब्राह्मण असल्याने काही लोक मला टार्गेट करतात -फडणवीस

6 आठवड्यात काही खेळाडू फॉर्ममध्ये येऊ शकतात, तर काही खेळाडूंचा फॉर्म खराब होऊ शकतो. अशावेळी अशा खेळाडूचे टीममध्ये असणे आवश्यक आहे जो सातत्याने चांगला खेळ करेल. जेव्हा मी टीमचा प्रशिक्षक होतो त्या दिवसात काही खेळाडूंना जास्त संधी मिळायला हवी होती. मात्र विराटचे मत वेगळे होते. पण आता या साऱ्या गोष्टी जुन्या झाल्या आहेत. हे पाहून चांगले वाटते आहे की एक कर्णधार म्हणून विराट परिपक्व झाला आहे.

वाचा :- उर्मिला मातोंडकर आहे सॉफ्ट पॉर्नस्टार -कंगना

तो आयपीएल ट्रॉफी देखील जिंकण्यास सुरुवात करेल’.जेनिंग्ज यांनी विराटचे कौतुक करत असे म्हटले की, ‘त्याची टीम सेमीफायनल आणि फायनल पर्यंत पोहोचली आहे. येणाऱ्या काळात त्याची टीम आणखी यशस्वी होील.’ कर्णधार म्हणून विराट कोहलीने आयपीएलमद्ये आतापर्यंत 109 इनिंग्जमध्ये 4010 रन्स केल्या आहेत.

वाचा :- अखेर पुरावा भेटला;चीनच्या लॅब मध्येच तयार झाला कोरोना विषाणू