भारत

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले;’या’ महिन्यात मिळेल कोरोना लस!

17 Sept :- देशभरात सध्या कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.अर्थव्यस्था कोलमडली आहे.नागरिकांचे जीवन पूर्णतः उध्वंस आणि विस्कळीत झाले आहे.सध्या प्रत्येकजण कोरोना लसीच्या प्रतीक्षेत आहे. भारतानेही कोरोनाविरोधातील लस तयार करून त्याचं ट्रायल सुरू केलं आहे, मात्र ही कोरोना लस कधी मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्यसभेत याचं उत्तर दिलं आहे. 2021 वर्षाच्या सुरुवातीला भारताला कोरोनाची लस उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना महासाथीची देशातील सद्य परिस्थिती, त्यावरील उपचार आणि लशींबाबत राज्यसभेत सविस्तर माहिती दिली. त्यांनी याबाबत निवेदन सादर केलं.

वाचा :- मराठा आरक्षणा बद्दल मुख्यमंत्री घेणार निर्णय उद्या-परवाच!

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, जगभरात जसे कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न होत आहेत, तसंच भारतातही सुरू आहे. भारतातील तीन लशी क्लिनिकल ट्रायलच्या वेगवेगळ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची एक समिती याचा अभ्यास करत आहे. प्रगत टप्प्यातील नियोजन केलं जात आहे.

वाचा :- मी जातीने ब्राह्मण असल्याने काही लोक मला टार्गेट करतात -फडणवीस

पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात लस उपलब्ध होऊ शकेल अशी आशा आम्हाला आहे. यासाठी आम्ही जागतिक आरोग्य संघटना आणि लशीसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांच्याही संपर्कात आहोत.

वाचा :- उर्मिला मातोंडकर आहे सॉफ्ट पॉर्नस्टार -कंगना