राजकारण

मी जातीने ब्राह्मण असल्याने काही लोक मला टार्गेट करतात -फडणवीस

17 Sept :- मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्यातलं वातावरण चांगलच तापलं आहे. आरक्षणाला स्थगिती देत हे प्रकरण सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने मोठ्या खंडपीठाकडे पाठवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला होता. आता त्यावर आरोप-प्रत्यारोपांनाही सुरूवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर पलटवार करत उत्तर दिलं आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

मी जातीने ब्राह्मण असल्यामुळे काही लोक सगळं खापर माझ्यावर फोडत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षणाचा घोळ झाला असा आरोप भाजपने केला आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या तत्कालीन सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत त्यामुळे हे आरक्षण रखडलं असे काँग्रेस-राष्ट्रवादीने केले आहेत.

वाचा :- मराठा आरक्षणा बद्दल मुख्यमंत्री घेणार निर्णय उद्या-परवाच!

फडणवीस पुढे म्हणाले, मला असं म्हणणं शोभणारं नाही, मात्र मी स्पष्टपणे सांगतो की केवळ माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्या माथी सर्व काही आरोप केले तर चालतील असं काही लोकांना वाटतं. ते मोजकेच लोकं आहेत. मात्र आरक्षणासाठी मी काय केलं हे मराठा समाजाला चांगलंच माहित आहे असंही ते म्हणाले.मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली हे धक्कादायक आहे. मात्र या संदर्भात केंद्र सरकारकडे बोट दाखवनं योग्य नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं. या प्रश्नावर राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा आहे असंही ते म्हणाले.

वाचा :- अखेर पुरावा भेटला;चीनच्या लॅब मध्येच तयार झाला कोरोना विषाणू