गडकरी कोरोनाच्या विळख्यात
16 सप्टेंबर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे गडकरी यांनी डाॅक्टरांचा सल्ला घेऊन चाचणी केली. त्यांची चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यानंतर सध्या नितीन गडकरी यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
स्वत: नितीन गडकरी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, काल त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर आहे. मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. त्यानंतर पुढे त्यांनी लिहिलं आहे की, माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व कोरोनाच्या नियमांचे पालन करा. व सुरक्षित राहा.
वाचा :- ‘या’ महिन्यापासून चीन उपलब्ध करून देणार ‘कोरोना लस
यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. रुग्णालयातून परतल्यानंतर पुन्हा श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
अखेर पुरावा भेटला;चीनच्या लॅब मध्येच तयार झाला कोरोना विषाणू