महाराष्ट्र

मराठा आरक्षणा बद्दल मुख्यमंत्री घेणार निर्णय उद्या-परवाच!

16 Sept :- मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मराठा संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

ही बैठक संपली असून लवकरच कायदेशीर बाबी तपासून घटनापीठकडे जाणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.’एक मार्ग ठरवण्याच्या जवळ आलो. विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले आम्ही सरकार सोबत आहोत. मराठा आरक्षणाबाबत गेल्या सरकार काळात देखील सर्व सोबत होतो. त्यांच्या सूचना एकत्र करू. परवा याबाबत निर्णय घेऊ,’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

वाचा :- ‘या’ महिन्यापासून चीन उपलब्ध करून देणार ‘कोरोना लस

‘कुठल्या पर्याय बाबत आम्ही आता बोलणार नाहीत. आधी सर्व कायदेशीर सल्ला घेणार आहोत. आंदोलन कधी केलं जातं? सरकार ऐकत नाही तेव्हा. मात्र आम्ही आंदोलकांसोबत आहोत. आंदोलनाचा विचार करा,’ असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना केलं आहे.

वाचा :- कोरोना सोडा, आणखी २ मोठी संकट येणार!