महाराष्ट्राचे धक्कादायक कोरोना अपडेट!
16 Sept :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आज मात्र कोरोना विषाणूच्या थैमानाने टॉप गेर उचलला आहे. अनलॉक ४ ची सुरुवात झाली आहे.जिल्हाबंदी देखील हटवण्यात आली आहे.मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्यात आता भरमसाठ वाढ होताना दिसू लागली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी रुग्णवाढ मात्र चिंताजनक होत चालले आहे.सध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येती की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी भर पडत आहे.राज्यात आज सरासरी दर तासाला एक हजार रुग्ण आढळले आहेत.आज राज्यात 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
कालच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी आज राज्यात 23365 नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. हा आकडा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत जास्त आहे.आज राज्यात 474 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.75 % इतका आहे. आज 17559 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण 792832 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 70.71 टक्के इतका झाला आहे.
वाचा :- ‘या’ महिन्यापासून चीन उपलब्ध करून देणार ‘कोरोना लस
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5506276 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 1121221 (20.36 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1753347 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 36462 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 297125 इथपर्यंत पोहोचली आहे.
वाचा :- अखेर पुरावा भेटला;चीनच्या लॅब मध्येच तयार झाला कोरोना विषाणू