आ. सुरेश धस अटक!
16 Sept :- आष्टी पोलीस ठाण्यात ऊसतोड मजूरांना अडविल्याप्रकरणी आ. सुरेश धस यांच्यावर ३४१,३४ भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्या जामिनची प्रक्रिया सुरु आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
आ.सुरेश धस यांनी ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असून मागील आठवड्यात त्यांनी एका टॅक्टरमधून जाणाऱ्या ऊसतोड कामगारांना विनंती करून घरी पाठवले होते.त्यानंतर बुधवारी एका टेम्पोतुन मजूर कारखान्याकडे जात असल्याचे आ.धस यांना समजताच त्यांनी मजुरांना आपल्या घरी जाण्याचे सांगितले.मात्र यावेळी पोलिसांनी मजुरांना अडवू नका अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करू असे सांगितल्यानंतर धस यांनी आक्रमक भूमिका घेत मजुरांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आपण एकही मजूर
कारखान्याकडे जाऊ देणार नसल्याचे सांगितले.
वाचा :- ‘या’ महिन्यापासून चीन उपलब्ध करून देणार ‘कोरोना लस’
त्यामुळे आष्टी पोलीस ठाण्यात रियाज कलीम पठाण यांच्याफिर्यादीवरून धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यातआला आहे.ते सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या जमिनची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे.दरम्यान मजूर इंडियन ऑईल पेट्रोल पंप च्या बाजूला दूध संघासमोर उभे असून धस या मजुरांना जाऊ देतील की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल.
वाचा :- शाळा सुरु करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली ही माहिती