बीड जिल्हा अँटीजन टेस्ट; 424 रुग्ण पॉंझिटिव्ह!
दिवसभरातील अँटीजन टेस्ट रिपोर्ट!
16 Sept :- बीड जिल्हयातील कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हयातील कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन अनेक युक्त्या लढवून कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. ४० गावांमधील कोरोना संसर्ग (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी, किरकोळ होलसेल विक्रेते, भाजीपाला-फळभाज्या विक्रेते दूध विक्रेते, बँक कर्मचारी, पेट्रोल पंप कर्मचारी आणि कन्टेनमेंट झोन मधील नागरिक यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार असून यासाठी तपासणी अभियान राबवण्यात येत आहे,
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
आज सकाळपासून अँटीजन तपासणीला सुरूवात झाली.आणि 5092 जणांच्या अँटीजन टेस्ट करण्यात आल्या.त्यापैकी 342 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये १५ सप्टेंबर २०२० च्या १७६ अँटीजन रुग्णांचा समावेश आहे.
यानंतर पुन्हा दिवसभरात 2145 अँटीजन तपासण्या करण्यात आल्या.या अँटीजन तपासणीमध्ये 82 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.अशा पद्धतीने आज दिवसभरात एकूण 424 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.