‘या’ महिन्यापासून चीन उपलब्ध करून देणार ‘कोरोना लस’
नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात सर्वसामान्यांना कोरोनाची लस!
15 Sept :- कोरोना व्हायरस रोखण्यासाठी तयार केलेली लस (कोविड -19 वॅक्सीन) अंतिम टप्प्यात असून नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल, असे चीनने म्हटले आहे. चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (सीडीसी) सोमवारी एक निवेदन जारी केले की, आम्ही यशाच्या अगदी जवळ आहोत आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात सर्वसामान्यांना कोरोनाची लस मिळण्यास सुरुवात होईल. यापूर्वी अशी बातमी आली होती की, एक लाख लोकांवर चाचणी करूनही चीनची लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
चीनने असे म्हटले आहे की, येथे तीन लस तयार केल्या जात आहेत, ज्या त्यांच्या अंतिम टप्प्यात आहेत, तसेच त्यांच्या चाचणीचे निकालही खूप प्रभावी आहेत.या तीन लस मूलभूत सुविधांशी संबंधित लोकांवर चाचणी केली जात आहे आणि ते यशस्वी झाले आहे. जुलै महिन्यातच फेज -3 मानवी चाचणीपूर्वी या लसी अनेक आवश्यक कामगारांवर वापर करताना पाहिले गेले आहेत. नोव्हेंबरमध्ये ही लस सर्वसामान्यांच्या हाती असेल, असे सीडीसी चीफ ग्युझो वू यांनी सांगितले. वू म्हणाले की, मी स्वतः लस घेतली आहे आणि मला कोणत्याही प्रकारची अस्वस्थता किंवा असामान्य लक्षणे वाटत नाहीत. ही लस चायना नॅशनल फार्मास्युटिकल ग्रुप (सिनोफार्म) आणि सायनोवाक बायोटेक यांनी तयार केली आहे.
वाचा :- मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
एक लाख लोकांवर चाचणी यशस्वी
चायना नॅशनल बायोटेक समूहाने आपली कोरोना विषाणूची लस सुरक्षित आणि प्रभावी घोषित केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत ज्या लोकांना या लसीची दोन्ही लस देण्यात आले आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. कंपनीने आपल्या अधिकृत WeChat अकाउंटवर म्हटले आहे की, आतापर्यंत या लसीचा डोस सुमारे 1 लाख लोकांना देण्यात आला आहे. चीनने तातडीने वापरण्यासाठी कोरोना विषाणूच्या तीन लस मंजूर केल्या आहेत. त्यापैकी दोन चायना नॅशनल बायोटेक ग्रुपने (सीएनबीजी) विकसित केले आहेत.
वाचा :- नेहरूंनी केलेल्या ‘त्या’ चुकीची पुनरावृत्ती मोदी करतायेत