बीड

मराठा समाज करणार ‘घरोघरी घंटानाद’

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय, ग्रामपंचायत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

15 Sept :- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजात प्रचंड चिड निर्माण झालेली आहे. मंगळवारी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली. यावेळी दि.१७ सप्टेंबर रोजी सर्व ग्रामपंचायत, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा तास धरणे आंदोलन आणि दि.१८ सप्टेंबर रोजी घरोघरी सांयकाळी ६ वाजता घंटानाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

बीड शहरातील आशिर्वाद मंगल कार्यालय येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून बैठक घेण्यात आली.यावेळी मराठा समाजातील तरूणांनी आपआपली मते मांडली. आरक्षण रद्द झाल्यामुळे प्रत्येकांच्या मनात चिडही दिसून येत होती. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी चर्चा करण्यात आली. बैठकीत पहिल्या टप्प्यात दि.१७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत येथे मराठा समाजाने अर्धा तास धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यांचे निवेदन ग्रामसेवक, तलाठी यांना द्यावयाचे आहे.

वाचा :- आठवडाभरात ‘हा’ मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो

तालुकास्तरावर अर्धा तास धरणे आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन द्यायचे आहे तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा तास धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. दि.१८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मराठा समाज आपआपल्या घरी गॅलरीत किंवा घराच्या छतावर घंटानाद आंदोलन करेल, असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, यापुढे आरक्षण जाहिर केले नाही तर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही देण्यात आला.

वाचा :- नेहरूंनी केलेल्या ‘त्या’ चुकीची पुनरावृत्ती मोदी करतायेत

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक भानुदास जाधव, ॲड.मंगेश पोकळे, प्रमोद शिंदे, अजित वरपे, भास्कर गायकवाड, राजेश भुसारी, भाऊसाहेब डावकर, अनिल घुमरे, स्वप्नील गलधर, रमेश चव्हाण, महेश धांडे, मळीराम यादव, गणेश मस्के, रवि शिंदे, सागर बहिर, राहूल टेकाळे, संतोष जाधव, किशोर गिराम, दत्ता गायकवाड, युवराज मस्के, ग़णेश मोरे, विठ्ठल बहिर,

वाचा :- धक्कादायक! 2024 पर्यंत तयार होणार कोरोना लस

वाचा :- मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश