नेहरूंनी केलेल्या ‘त्या’ चुकीची पुनरावृत्ती मोदी करतायेत
15 Sept :- भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाच कलमी कार्यक्रमावर सहमती दर्शवल्यानंतरही चिनी प्रसारमाध्यमांकडून भारताला धमकवण्याचे आणि भारतावर दबाव टाकण्याचे प्रयत्न केले जात आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये चिनी विशेतज्ज्ञ झांग शेंग यांनी एका लेखामधून भारताने १९६२ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वाखाली जी चूक केली होती तीच चूक आता ते परत करत असल्याचे म्हटले आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
भारत सरकार सीमेवर आक्रामक भूमिका घेताना दिसत असल्याचा मुद्दा मांडत त्यांनी यासंदर्भात एका लेखामध्ये भाग केलं आहे.झांग यांनी सध्याच्या परिस्थितीची तुलना १९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धाच्या वेळेच्या परिस्थितीशी केली आहे.भारत स्वत:च्या हितासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीने चीनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. १९६२ मध्येही चीन इतर देशांपासून अगदी वेगळा होता. त्यावेळी चीन अमेरिकेला तोंड देत होता त्याचबरोबर रशियाशीही चीनचे फारसे काही चांगले संबंध नव्हते. त्यावेळी भारत गटनिरपेक्षता आंदोलनाचे नेतृत्व करत होता.
वाचा :- धक्कादायक! 2024 पर्यंत तयार होणार कोरोना लस
चिनी विश्लेषकाने भारताने १९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा फायदा करुन घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या लेखामध्ये केला आहे. भारताच्या या प्रयत्नांमुळेच भारताने तिसऱ्या जगातील देशांचा (म्हणजेच शीत युद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि रशिया यांची बाजू न घेणारे देश) नेता असण्याचा मानही गमावला. भारतामध्ये सध्या सत्तेत असणारी मोदी सरकारही याच योजनेवर काम करत आहे. चीन आणि अमेरिकेदरम्यान असणाऱ्या राजकीय तणावाचा फायदा उचलण्याचा भारताचा डाव असल्याचा दावा झांग यांनी केला आहे. भारताचे संरक्षणमंत्री अतिआत्मविश्वास दाखवत असल्याचेही झांग यांनी म्हटलं आहे.झांग यांच्याबरोबरच परराष्ट्र विषयांसंदर्भातील अन्य एक चिनी तज्ज्ञ किआंग फेंग यांनी जयशंकर आणि वांग यी यांच्या बैठकीनंतर आता निर्णय भारताला घ्यायचा आहे असं म्हटलं आहे. आता भारत या पाच कलमी कार्यक्रमाला कशापद्धतीने लागू करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे असं फेंग यांनी म्हटलं आहे.
वाचा :- मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
राफेलसंदर्भातील एका कार्यक्रमामध्ये भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत भारतीय संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यांमध्ये विरोधाभास दिसून येत असल्याचं फेंग यांनी नमूद केलं.चीन भारताला आपला शत्रू मानत नाही असा दावाही फेंग यांनी केला आहे. भारतासंदर्भातील भूमिका चीनने बदललेली नाही. त्याचप्रमाणे भारताबरोबरच व्यापारी संबंध सामान्य करण्याची चीनची इच्छा असल्याचे फेंग यांनी म्हटलं आहे. चीनला भारताबरोबर सुरु असलेला सीमावाद हा शांततेच्या मार्गाने सोडवायचा आहे. मात्र असं करताना चीन स्वत:च्या हिताशी तडजोड करणार नाही, असंही फेंग म्हणाले आहेत.