‘जो लोग जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है’-बच्चन
15 Sept :- बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेकांनी यावर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोरखपूरचे खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी संसदेत देश आणि बॉलिवूडमधील ड्रग्जच्या वाढता वापर आणि तस्करीचा मुद्दा मांडला होता. यावर आता खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
जया बच्चन यांनी कोणाचंच नाव न घेता ‘जो लोग जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है’ असं म्हणत रवी किशन यांच्यावर हल्लाबोल केला आहे.जया बच्चन संसदेत बोलताना म्हणाल्या की, ‘चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य काल इंडस्ट्रीविरोधात बोलत होते.
वाचा :- धक्कादायक! 2024 पर्यंत तयार होणार कोरोना लस
हे अत्यंत लज्जास्पद आहे. मी कोणाचंही नाव घेत नाहीये. ते स्वतःही याच इंडस्ट्रीत काम करतात. जो लोग जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है. ही चुकीची गोष्ट आहे. मला आता सांगावं लागत आहे की, इंडस्ट्रीला सरकारच्या सुरक्षेची आणि समर्थनाची गरज आहे.’