सिनेमा,मनोरंजन

महेश कोठारेंना विधानपरिषदेवर मिळणार संधी

प्रख्यात अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून संधी द्यावी अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पुण्यातील सलाम पुणे या संस्थेने केली आहे. या संस्थेचे अध्यक्ष शरद लोणकर आणि कार्याध्यक्ष सुभाषचंद्र जाधव यांनी या संदर्भात राज्यपालांना आज पत्र पाठविले आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

1968 पासून बालकलाकार असताना ‘तू कितनी अच्छी है, प्यारी प्यारी है, ओ मा’ या ‘राजा और रंक’ सिनेमातील लोकप्रिय गाण्यापासून ते आजवर महेश कोठारे यांनी केलेल्या सिनेक्षेत्रातील प्रवासाचा अनेकदा गौरव झाला आहे. 2 वेळा फिल्म फेअर, आठ वेळा महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार, 3 वेळा सलाम पुणे पुरस्कार मिळवणाऱ्या महेश कोठारे यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून कलावंत घडविले. त्यातील अनेकांना उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. कोठारे यांचा संपूर्ण परिवार सिने सृष्टीत कार्यरत आहे.

वाचा :- मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

आपल्या योगदानाने कोठारे परिवाराची ओळख घराघरात निर्माण झाली आहे. जनतेशी त्यांची थेट नाळ जोडली गेली आहे. एका खऱ्या कलाहित, समाजहित जोपासणाऱ्या प्रख्यात अभिनेत्याला विधानपरिषदे वर काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती आहे. असे या पत्रात लोणकर आणि जाधव यांनी म्हटले आहे.

वाचा :- ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानचं आलं समोर

दरम्यान, स्टार प्रवाहवर सुरु असणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचा मुहूर्त काही दिवसांपूर्वी संपन्न झाला. फारच कमी वेळात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन्सने या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव मुख्य भूमिका साकारली आहे.

वाचा :- धक्कादायक! 2024 पर्यंत तयार होणार कोरोना लस