राजकारण

काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीकेची झोड

15 Sept :- भारत-चीन सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर वारंवार विविध प्रकारे चीन भारतील सैन्याला त्रास देत आहे. त्यानंतर केंद्र सरकारने चीनला धडा शिकवण्याच्या सर्व योजना आखल्या आहेत. या विवादादरम्यान आज संसदेच्या अधिवेशनात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या रक्षणासाठी विविध योजना सुरू असल्याचे सांगितले.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

चीनला विविध प्रकारे धडा शिकवला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यादरम्यान काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.त्यात काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.सुरजेवाला यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, मा. राजनाथजी देश सैन्यासोबत एकजूट आहे…मात्र हे सांगा…चीनने आमच्या जागेत कब्जा करण्याचं धाडस कसं काय केलं? मोदींनीं चीनद्वारे देशाच्या सीमेत घुसखोरी करण्याबाबत गोंधळ का निर्माण करण्यात आला? चीनला देशातून केव्हा बाहेर काढणार?

वाचा :- ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानचं आलं समोर

सुरजेवाला यांनी ट्विट करीत राजनाथ सिंहासमोर प्रश्नांची यादीत समोर ठेवली आहे. सुरजेवाला यांच्या ट्विटवर अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काँग्रेसच्या काळात चीनकडून कसा त्रास दिला जात होता, अशा आशयाची प्रतिक्रिया एका वापरकर्त्याने दिली आहे.

वाचा :- मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश