बीड

मंगळवारी ठरणार मराठा आंदोलनाची दिशा!

14 Sept :- गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षण मिळवण्याकरिता शिस्तीमध्ये आंदोलन करत आरक्षणाची मागणी करतो आहे.मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास सध्या स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. आरक्षण मिळावे याकरिता मराठा समाज अनेक ठिकाणी पुन्हा आंदोलन करण्याची तयारी करत आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी सवांद साधताना मराठा समाजाला मोर्चे काढून आंदोलन करून नका असे आवाहन केले आहे.मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेल्या स्थगितीमुळे मराठा समाज चांगलाच संतप्त आणि नाराज असल्याचे दिसून येत आहे.

वाचा :- धक्कादायक! 2024 पर्यंत तयार होणार कोरोना लस

सध्या सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास तर स्थगिती दिली आहे.आणि आरक्षणही मिळवायचे आहे.यासाठी इथून पुढे आरक्षण मिळवण्यासाठी विचारविनिमय करून आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बीडमध्ये ठिकण आशीर्वाद मंगल कार्यालय,बार्शी रोड येथे दुपारी २.०० वाजता मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने मराठा बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये आंदोलना बाबद संपूर्ण विचार विनिमय होऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याची माहिती बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने दिली आहे.

वाचा :- कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बलात्कार