महाराष्ट्राचे धक्कादायक कोरोना अपडेट!
14 Sept :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आज मात्र कोरोना विषाणूच्या थैमानाने टॉप गेर उचलला आहे. अनलॉक ४ ची सुरुवात झाली आहे.जिल्हाबंदी देखील हटवण्यात आली आहे.मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्यात आता भरमसाठ वाढ होताना दिसू लागली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी रुग्णवाढ मात्र चिंताजनक होत चालले आहे.साध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येती की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी भर पडत आहे.राज्यात आज सरासरी दर तासाला एक हजार रुग्ण आढळले आहेत.राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 17,066 नवीन रुग्णांचे निदान झालं. राज्यात आज 257 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.77% एवढा आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 10 लाख 77 हजार 374 एवढी झाली आहे.
वाचा :- धक्कादायक! 2024 पर्यंत तयार होणार कोरोना लस
दिवसभरात 15,789 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 7 लाख 55 हजार 850 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण70.16% एवढे झाले आहे. राज्यात सध्या एकूण 2 लाख 91 हजार 256 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 53, 21,116 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 10, 77, 374 (20.2 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17,12,160व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 37, 198 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.