संतापजनक! 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
14 Sept :- राज्यभरामध्ये सध्या सर्वत्र सर्वजण कोरोना विषाणूशी आणि कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीशी दोन हात करत लढा देत आहे. आशा भयाण परिस्थितीमध्ये समाजात मानवतेस कलंक लावणाऱ्या अकल्पनीय घटनांमुळे संतापाची भावना निर्माण होत आहे.ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर परिसरातील एका कोविड सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना अशाच एका घटनेनं मुंबई हादरली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
एका 5 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला आहे. 10 रुपये देण्याचं आमिष दाखवून शेजारी राहाणाऱ्या 59 वर्षीय नराधमानं चिमुरडीच्या अब्रुचे लचके तोडले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धारावीत ही मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे.मिळालेली माहिती अशी की, पीडित चिमुरडीनं या घटनेची माहिती आईला सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. मुलीच्या हातात 10 रुपयांची नोट होती. त्याबाबत आईनं तिला विश्वासात घेवून विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला.
वाचा :- धक्कादायक! 2024 पर्यंत तयार होणार कोरोना लस
पीडितेच्या आईने धारावी पोलिस स्टेशन गाठलं आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीची गंभीर दाखल घेत पोलिसांनी आरेपीला अटक केली आहे.नराधमानं पीडित मुलीला आपल्या बोलावून घेतलं. होतं. पीडित मुलीला 10 रुपये देवून नराधमानं तिच्यावर अत्याचार केला, असं पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती धारावी पोलिसांनी दिली आहे.