भारत

धक्कादायक! 2024 पर्यंत तयार होणार कोरोना लस

कोरोना विषाणूमुळे त्रस्त असलेली मानवी आयुष्य पूर्णतः विस्कळीत आणि आता उद्ध्वस्त होऊ लागले आहे.कोरोना लस पुढच्या महिन्यात येणार, लस आली की मगच शाळा सुरू होणार वगैरे आशेवर पुनावालांच्या स्पष्टोक्तीमुळे विरजण पडलं आहे.प्रत्येकाच्या मनात सध्या कोरोना लस कधी येणार हा प्रश्न उभा आहे.कोरोना रुग्णवाढीमुळे प्रशासन चिंतेत आहे.तर कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावापासून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करून करून प्रत्येकाची कसरत होऊ लागली आहे. कोरोना विषाणूमुळे आर्थिक व्यवस्थेचं कंबरडं मोडल्या गेले आहे.तर सर्व सामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोना लशीची थांबलेली चाचणी सुरू झाली असली, तरी लसनिर्मितीची प्रक्रिया सोपी नाही.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

प्रत्येकापर्यंत लस पोहोचण्यासाठी 2024 सालची अखेर उजाडेल, असं खुद्द सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्रमुखांनीच स्पष्ट केलं आहे. लवकरच कोरोनाची लस बाजारात येईल या आशेला सीरमच्या आदर पुनावाला यांच्या खुलाशामुळे लगाम घालावा लागणार आहे.सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला म्हणाले, “जगाच्या लोकसंख्येचा विचार करता लसनिर्मिती करणाऱ्या फार्मा कंपन्या एवढी निर्मिती करण्याच्या क्षमतेच्या नाहीत. “Serum Institute ही कोरोनाच्या लसनिर्मितीतली मोठी संस्था मानली जाते. AstraZeneca आणि Novavax यांच्यासह जगभरात पाच संस्था मिळून लशीचे 100 कोटी डोस निर्माण करण्यात येत आहे. यातले निम्मे डोस भारतासाठी असेल.जगातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवायची असेल तर त्यासाठी किमान पाच वर्षं लागतील, असं आदर पुनावाला यांनी स्पष्टपणे सांगितलं.

वाचा :- वुहानच्या प्रयोगशाळेत करोना विषाणूची निर्मिती; चीनमधून पळालेल्या शास्त्रज्ञाचा दावा

Corona vacciene चे दोन डोस घ्यावे लागणार असतील तर 15 अब्ज डोस आवश्यक आहेत, असंही पुनावाला यांनी यापूर्वी सांगितलं होतं.रोटाव्हायरस, कांजिण्या आदी रोगांवरच्या लशी अशाच दोन डोस घेतल्याशिवाय उपयुक्त ठरत नाहीत.आता रशियाने निर्माण केलेल्या स्पुटनिक लशीसाठी (Sputnik vaccine) रशियाच्या गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूटशी करार करण्याचाही सीरम इन्स्टिट्यूटचा विचार आहे. या पद्धताने लसनिर्मितीच्या कामाला वेग येऊ शकतो, असं आदर पुनावाला म्हणाले.कोरोना लस पुढच्या महिन्यात येणार, लस आली की मगच शाळा सुरू होणार वगैरे आशेवर पुनावालांच्या स्पष्टोक्तीमुळे विरजण पडलं आहे.

वाचा :- ऑक्सिजन सिलिंडरचा टेम्पो पळवला, करोना संकटात टंचाई असताना झाली चोरी

आदर पुनावाला यांनी असंही म्हटलं आहे की, लसनिर्मितीच्या प्रक्रियेत असलेली कुठलीही संस्था किंवा कंपनी महिन्याभरात गरजू व्यक्तीपर्यंत लस पोहोचवण्याच्या टप्प्यापर्यंत आलेली नाही. सगळ्या जगाला कोरोना लशीकडून आशा आहे. अनेक जागतिक नेत्यांनी लसनिर्मितीची प्रक्रिया वेगाने करण्यासाठी सर्व जोर लावला आहे आणि पुढच्या काही दिवसात लस येईल म्हणून प्रीबुकिंगही केलं आहे. पण खोटी आश्वासनं देण्यात अर्थ नाही. मला नाही वाटत कुठलीही संस्था याच्या जवळपासही आहे, असं पुनावाला म्हणाले

वाचा :- आठवडाभरात ‘हा’ मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो