महाराष्ट्र

आठवडाभरात ‘हा’ मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो

14 Sept :- राज्यातील मंदिरांमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. राज्यातील मंदिरं खुली झाली तर मोठा महसूल राज्य सरकारला मिळेल. सरकारसोबत चर्चा सुरु आहे. मंदिरं खुली करण्यासाठीची नियमावली आखण्याचं काम सरकार करत आहे. येत्या आठवडाभरात मंदिर खुली करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. राज्यात कोरोनाच्या स्थितीमुळे राज्याची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्याला या संकटातून उभं करण्यासाठी सरकारने योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्याचा महसूल वाढावा यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचं आहे. त्यामुळे राज्याची महसूल वाढावा यासाठी सरकार नेमक्या काय उपाययोजना करत आहेत हे विचारने आवश्यक आहे. प्रत्येक मंत्र्याला एक एक जबाबदारी दिली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.कोरोनाची स्थिती गंभीर आहे. राज्यात कोरोना रुग्णांना वाचवण्यात सरकारची भूमिका काहीही नाही. कोविड सेंटर्सकडे सरकार लक्ष देत नाही. कोविड सेंटर खासगी कंपन्यांना चालवण्यात दिल्याने तिथे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

वाचा :- ऑक्सिजन सिलिंडरचा टेम्पो पळवला, करोना संकटात टंचाई असताना झाली चोरी

कोरोना काळात जी माणसं दगावतायेत ती केवळ कोरोनाचे रुग्ण नाहीत. इतर आजाराने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याच्या भूमिकेमुळे इतर आजार असलेले रुग्ण दगावत आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.जो पर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणही मिळणार नाही. त्यामुळे गरीब मराठ्यांनी आपली भूमिका घेणे गरजेचं आहे. आपल्या जातीबरोबर राहायचं की आरक्षणासोबत राहायचं हे त्यांनी ठरवणे गरजेचं आहे.

वाचा :- वुहानच्या प्रयोगशाळेत करोना विषाणूची निर्मिती; चीनमधून पळालेल्या शास्त्रज्ञाचा दावा