राजकारण

‘या’ शब्दात पवारांनी टोचले शिवसेनेचे कान,म्हणाले…

9 Sept :- बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणौतचे कार्यालय अनधिकृत बांधकामामुळे मुंबई महापालिकेने हातोडा उगारला आहे. यामुळे शिवसेना आणि कंगना वाद आता आणखी चिघळला असून या कारवाईवर आता भाजपासह राष्ट्रवादीनेही प्रश्न उपस्थित केला आहे. शरद पवार यांनी सांगितले की, कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई करत तिला बोलण्यासाठी अनावश्यक संधी दिली आहे. मुंबईमध्ये कित्येक अनधिकृत बांधकामे आहेत. आता अधिकाऱ्यांनी हा निर्णय का घेतला हे पहावे लागेल.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

प्रत्येकाला माहिती आहे की, मुंबई पोलीस सुरक्षेसाठी काम करते. यामुळे कंगना सारख्या लोकांना प्रसिद्धी देता नये, अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेचे कान टोचले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाआघाडीचे सरकार आहे. तर मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा ताबा आहे.या प्रकरणावारील माध्यमे देत असलेल्या प्रसिद्धीवरही मला आक्षेप आहे. माध्यमे ही गोष्ट मोठी करत आहेत. आपल्याला अशा गोष्टी टाळायला हव्यात, असेही पवारांनी एएनआयशी बोलताना सांगितले. तसेच बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी जी कारवाईची वेळ निवडली आहे ती देखील लोकांमध्ये चुकीचा संदेश देते, असे पवार म्हणाले.

वाचा :- ऊध्दव ठाकरे,आज मेरा घर टुटा कल तेरा घमंड टुटेगा!

कंगना आज मुंबईत पोहोचण्याआधीच महापालिकेने तिच्या ऑफिसवर हातोडा मारायला सुरुवात केली होती. मुंबईची पीओकेशी तुलना करणे कंगना राणौतला भोवले. आज मुंबई महानगरपालिकेने कंगनाला जोरदार दणका देत, तिच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत कारवाई केली. मात्र, यावर कंगनाने पुन्हा मुंबई पीओके असल्याचे म्हणत माझे कार्यालय राम मंदिर आहे का ज्यावर बाबराने हल्ला केला, अशी टीका केली आहे.

वाचा :- कंगना होणार महाराष्ट्राची मुख्यमंत्री!


पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचे फोटो कंगनाने ट्विट केले असून बाबरची सेना, पाकिस्तान, पाकिस्तानव्याप्त काश्मीर असे उल्लेख करण्यात आले आहेत. ही लोकशाहीची हत्या असल्याचे तिने म्हटले आहे.पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने स्थगिती देण्याआधीच कंगनाचे ऑफिस तोडण्यात आले होते.

वाचा :- ‘या’ कारणामुळे नवनीत राणा संतापल्या!