क्रीडा

युवी निवृत्ती परत घेऊ इच्छितोय; BCCI ला लिहिले पत्र!

युवीला पुन्हा क्रिकेट खेळायचं!

9 Sept :- भारतीय संघाचे माजी खेळाडू युवराज सिंह आपली निवृत्ती परत घेऊ इच्छित आहेत. आणि यासाठी त्यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्र लिहिले आहे. ते पुन्हा देशांतर्गत क्रिकेटच्या येत्या सत्रात पंजाबसाठी खेळू शकतात. युवीने बुधवारी क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.युवराज सिंहने गेल्या वर्षी 10 जून रोजी क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून संन्यास घेतला होता.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

क्रिकेटमध्ये परतण्याच्या योजनेवर 38 वर्षीय युवराज म्हणाला, मी शुभमन गिल, प्रभसिमरन सिंह, हरप्रीत बरार यांसराख्या पंजाबच्या युवा क्रिकेटरांसोबत मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये काही वेळ घालवला आणि मला खूप मजा आली.मी त्यांच्यासोबत खेळाच्या विविध पैलूंबाबत चर्चा केली. यावेळी मी अनुभवले की मी त्यांना जे काही सांगत होतो, ते त्यांना कळत होते. युवी पुढे म्हणाला की, त्या खेळाडूंना खेळाबाबत काही आणखी महत्त्वाचे पैलू सांगण्यासाठी मला नेटवर जावे लागले. तेथे मी ज्या प्रकारे बॉलला हिट केले मलाच याचं आश्चर्य वाटलं.

वाचा :- ऊध्दव ठाकरे,आज मेरा घर टुटा कल तेरा घमंड टुटेगा!

खरं पाहता मी बराच काळ खेळलो नाहीये.पंजाब क्रिकेट संघाने भारताचे माजी ऑलराउंडर युवराज सिंहच्या संन्यासाचा निर्णय परत घेत प्रदेशातील टीममधील खेळाडू आणि मेंटर होण्याचा आग्रह केला होता. पीसीए सचिव पुनीत बाली यांनी सांगितले की त्यांनी युवराजकडे याबाबत आग्रह केला आहे. युवराजने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविला केलं होते. त्यानंतर युवरात गेल्या वर्षी परदेशी लीगमध्ये सहभागी झाला होता. ज्यामध्ये ग्लोबल टी-20 कॅनडा आणि अबुधाबी टी-10 लीग सामील आहे.

वाचा :- कंगना होणार महाराष्ट्राची मुख्यमंत्री!

वाचा :- ‘या’ कारणामुळे नवनीत राणा संतापल्या!