‘या’ कारणामुळे नवनीत राणा संतापल्या!
9 Sept :- शिवसेना नेते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावत बाबत केलेलं वक्तव्य निषेधार्ह असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांचा तातडीने राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.खासदार नवनीत राणा यांनी अभिनेत्री कंगना राणावतची बाजू घेत राज्य सरकारवर टीका केली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. ही अत्यंत चुकीची कारवाई आहे. कंगनाच्या ऑफिसवर कारवाई करायला ते आज तयार झालेलं नाही. दोन वर्षांपूर्वी कंगनाचं हे ऑफिस तयार झालेलं आहे. पण त्यावर आज कारवाई केली जात आहे. केवळ कंगनाने भूमिका घेतली म्हणून तिच्या कार्यालयावर कारवाई केली जात आहे. या सर्व गोष्टींना शिवसेना नेते संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
वाचा :- ऊध्दव ठाकरे,आज मेरा घर टुटा कल तेरा घमंड टुटेगा!
शिवसेना नेते संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी महिलांबद्दल सार्वजनिक ठिकाणी बोलताना निश्चितच भान ठेवायला हवं होतं. महिलांबद्दल बोलताना मानमर्यादा ठेवून बोललं पाहिजे. खासदार असूनही महिलांना शिवीगाळ करणं, त्यांच्याविषयी अपशब्द वापरणं योग्य नाही, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राऊत यांची पाठराखण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राऊत यांचं समर्थन करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी उघडपणे त्यांचं समर्थन करावं अन्यथा राऊत यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा घ्यावा.
वाचा :- कंगना होणार महाराष्ट्राची मुख्यमंत्री!
ही केवळ माझीच मागणी नाही तर महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गांची ही मागणी आहे, असं राणा म्हणाल्या. शिवसेनेच्या मुखपत्रातून नेत्यांवर कोणत्याही भाषेत शेरेबाजी केलेली चालते. तेव्हा कारवाई होत नाही आणि कंगनावर मात्र तात्काळ कारवाई करण्यात येत आहे, हे कोणतं धोरण?, असा सवालही त्यांनी केला.
वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!
गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूरमध्ये मोठा पूर आला. लोकांचं जनजीवन उद्ध्वस्त झालं.संसार उघड्यावर आले. पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर अद्यापही काहीच केलं नाही. मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीच्या बाहेर पडावं आणि या जिल्ह्याची परिस्थिती जाणून घ्यावी, असं आवाहन करतानाच राज्यात करोनाने हाहाकार उडालेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन करोना परिस्थितीचा आढावा घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.